Thursday, March 30, 2023

इंग्लंड दौऱ्यापूर्वी ऋषभ पंतला कपिल देव यांनी दिला ‘हा’ सल्ला

- Advertisement -

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाचे वर्ष भारताचा विकेट किपर बॅट्समन ऋषभ पंत याच्यासाठी खूप चांगले गेले आहे. त्याने या वर्षात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट मालिकेत चांगली कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. याबरोबर त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कपिटल्सच्या संघाचे नेतृत्व करून सगळ्यांना प्रभावित केले आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्याअगोदर ऋषभ पंतची दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अव्व्ल स्थानी होती. आगामी इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाला ऋषभ पंतकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या दौऱ्यापूर्वी महान क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी वर्ल्ड कप विजेते कॅप्टन कपिल देव यांनी ऋषभ पंतला एक मोलाचा सल्ला दिला आहे.

काय दिला सल्ला?
ऋषभ पंतने थोडे संथ खेळण्याची गरज आहे, असे मत कपिल देव यांनी व्यक्त केले आहे. इंग्लंड दौऱ्यात पंतला आक्रमकतेबरोबरच सावध खेळ खेळण्याची आवश्यकता आहे. त्याने जर तसे केले तर त्याला दीर्घकाळ बॅटींग करता येईल, असा सल्ला कपिल देव यांनी दिला आहे.

- Advertisement -

रोहित शर्माशी तुलना
कपिल देवने समान शैलीच्या आधारावर ऋषभ पंतची रोहित शर्मा याच्याबरोबर तुलना केली आहे. “टीम इंडियात आल्यानंतर पंत खूप परिपक्व झाल्याचं दिसत आहे. त्याच्याकडे शॉट्स खेळण्यासाठी जास्त वेळ असल्यााचे वाटते. त्याच्याकडे अनेक प्रकारचे शॉट्स आहेत. मात्र इंग्लंड दौरा आव्हानात्मक असणार आहे. असे कपिल देव म्हणाले आहेत. त्याने जास्त वेळ बॅटींग करावी, तसेच प्रत्येक बॉलर फटका मारण्याचा प्रयत्न करु नये. आपण रोहित शर्माबद्दल देखील हेच सांगतो. रोहित शर्माकडे देखील खूप शॉट्स आहेत. पण तो सतत क्रिजच्या बाहेर येऊन खेळत असतो.

ऋषभ पंत एक ‘मॅच विनर’ आहे. तेव्हा त्याने आक्रमक फटकेबाजी करण्यापूर्वी स्थिरावण्यावर भर द्यावा. इंग्लंडचा दौरा अवघड आहे, असे कपिल देव यांनी सांगितले आहे. ऋषभ पंत सध्या टीम इंडियातील इतर खेळाडूंसोबत मुंबईमध्ये क्वारंटाईन आहे. टीम इंडिया 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे. इंग्लंडमध्ये 18 रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे.