रमेश पोवार कोच झाल्यानंतर कर्णधार मिताली राजने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी रमेश पोवार यांची भारतीय महिला क्रिकेट टीमचे कोच म्हणून दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली. याअगोदर रमेश पोवार यांना 2018 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपनंतर मिताली राज यांच्याबरोबर झालेल्या वादामुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे आता तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा कोच म्हणून परतलेल्या रमेश पोवार यांच्यासोबत मिताली राज जुळवून घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या सगळ्यावर महिला वन-डे आणि टेस्ट टीमची कर्णधार मिताली राजने प्रतिक्रिया देऊन सर्वांची मने जिंकली आहेत.

मिताली राज यांची प्रतिक्रिया
मिताली राज यांनी आपण यापूर्वीचे सर्व वाद विसरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.तसेच “यापूर्वी घडलेल्या घटना हा भूतकाळ आहे. आता आपण मागे जाऊ शकत नाही. रमेश पोवार यांच्याकडे नक्कीच काही योजना असतील. आम्ही दोघे मिळून टीमचं जहाज पुढे नेणार आहोत. आम्ही एकत्र काम करु आणि भविष्यातील मजबूत टीम तयार करु, कारण पुढच्या वर्षी वर्ल्ड कप देखील आहे.’ अशी प्रतिक्रिया मिताली राजने दिली आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी योजना
भारतीय महिला टीम जूनमध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टेस्ट मॅचने होणार आहे. भारतीय महिला टीम जवळजवळ 7 वर्षांनी टेस्ट मॅच खेळणार आहे.या दौऱ्यासाठी कर्णधार मिताली राज यांनी पूर्ण तयारी केली आहे. “सर्व तरुण क्रिकेटर्स आणि माझ्यासाठी देखील या मॅचमध्ये कोणताही दबाव नसेल. आम्ही खूप दिवसांनी टेस्ट मॅच खेळत आहोत. त्याममुळे कोणताही दबाव न घेता प्रदर्शन करणार आहोत.” असे मत मिताली राज यांनी व्यक्त केले आहे. भारतीय महिला टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पिंक बॉल टेस्ट देखील खेळणार आहे. मिताली राजने याबाबत आनंद व्यक्त केला आहे. ‘आम्ही ऑस्ट्रेलियात डे-नाईट टेस्ट खेळणार आहोत ही एक चांगली बाब आहे. महिला क्रिकेट टीमला सातत्याने टेस्ट मॅच खेळण्याची संधी मिळाली पाहिजे असे मत कर्णधार मिताली राजने व्यक्त केले आहे.

Leave a Comment