शॉन पोलॉक म्हणाला,’यामुळेच ऑस्ट्रेलियामध्ये फलंदाजी करताना सचिनला त्रास झाला’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार शॉन पोलॉक ने असा दावा केला आहे की महान फलंदाज सचिन तेंडुलकरने एकदा त्याला सांगितले होते की त्याला ऑस्ट्रेलियात शॉर्ट पिच चेंडूंचा सामना करण्यास त्रास होतो,परंतु विकेटकीपर आणि स्लिपवरून प्रभावीपणे शॉट खेळत ती परिस्थिती हाताळण्यात तो यशस्वी झाला.

‘स्काय स्पोर्ट्स’च्या पॉडकास्टवर पोलॉक म्हणाला, “एकदा त्याचे ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाण्याविषयी माझ्याशी बोलणे झाले होते आणि सांगितलेले की आता त्याला शॉर्ट पिच चेंडूंचा सामना करताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तो विकेटकीपर आणि स्लिपच्यावरून चेंडू टोलवतोय.

What are some of the most amazing shots hit by Sachin Tendulkar in ...

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३९३ आणि कसोटी क्रिकेटमध्ये ४२१ विकेट घेणारा पोलॉक म्हणाला की, असा एक काळ होता जेव्हा सचिनच्या विरुद्ध त्याच्या गोलंदाजीच्या सर्व प्लॅन संपले होते आणि त्याने या फलंदाजाची चूक करण्याची वाट पाहीली.असा एक काळ होता, विशेषत: उपखंडात, जेव्हा आपण विचार करता,आम्हाला खात्री नसायची की आम्ही या खेळाडूला बाद करू शकू”असे पोलॉक म्हणाला.

Sachin Tendulkar Upper Cut | Test cricket, Cricket sport, Sachin ...

आतापर्यंतचा महान फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत क्रिकेटच्या तीनही स्वरूपात मिळून ३४,३५७ धावा केल्या आहेत.सचिनने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८,४२६ धावा तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याने १५,९२१ धावा केल्या आहेत.तसेच १०० आंतरराष्ट्रीय शतके (५१ कसोटी आणि ४९ एकदिवसीय) करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.

7 Indian batsmen who got to number 1 spot in ICC Test rankings

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment