अंपायर सायमन टॉफेल यांनी केलं धोनीचे कौतुक ; म्हणाले की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमीच आपल्या शांत डोक्यासाठी ओळखला जातो. सामन्याची परिस्थिती कशीही असली तरी धोनी नेहमीच शांत डोक्याने विचार करून व्युहरचना रचत असतो.म्हणूनच धोनीला ‘कॅप्टन कूल’ असंही म्हणलं जाते.२००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ मध्ये चँपियन्स ट्रॉफी अशा आयसीसीच्या तीनही स्पर्धा जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे.तसेच इंडियन प्रीमियर लीग मध्ये धोनीने चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करताना ३ वेळा कप जिंकला आहे.

जगातील सर्वोत्कृष्ट अंपायर अशी ओळख असलेल्या सायमन टॉफेल यांनी नुकतेच महेंद्रसिंग धोनीचे कौतुक करताना म्हटले आहे की, भारताचा हा माजी कर्णधार स्मार्ट क्रिकेट माईंड ठेवतो. धोनी हा क्रिकेट जगातील सर्वात हुशार खेळाडू आहे. सायमन टॉफेल यांनी क्रिकेट वर्ल्डला सांगितले की, धोनी आश्चर्यकारकपणे रणनीती बनवतो आणि त्याच्याकडे उत्तम क्रिकेट ब्रेन आणि खेळाप्रती ज्ञान आहे. त्याचा स्वभाव आणि संयम खरंच आश्चर्यकारक आहे.

महेंद्रसिंग धोनीने 90 कसोटी सामन्यांमध्ये 38.1 च्या सरासरीने 4876 धावा केल्या आहेत. त्याने 350 एकदिवसीय सामन्यात 10773 धावा केल्या आहेत. धोनीने 98 टी-20 मध्ये 37.6 च्या सरासरीने 1617 धावा केल्या आहेत.धोनीने प्रदीर्घ काळ भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले.

Leave a Comment