तर भारत विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाला मुकणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | २०२३ ची विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. मात्र २०१६ साली भारतात आयोजित केलेल्या टी २० क्रिकेट स्पर्धेत टीडीएस म्हणून कापलेल्या १६० कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अन्यथा २०२३ च्या यजमानपदाला मुकावे लागेल, असा इशाराच आयसीसीने बीसीसीआयला दिला आहे. ही रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत भरावी लागणार आहे.

आयसीसीच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आता बीसीसीआयकडे अवघे १० दिवस उरले आहेत. सध्या बीसीसीआय सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय मंडळाच्या नियंत्रणाखाली आहे. मागणी केलेली रक्कम दहा दिवसात न भरल्यास २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेबरोबरच २०२१ च्या चॅम्पियन करंडक स्पर्धेच्या यजमानपदासाठीही वेगळा विचार करू, असा इशाराही आयसीसीने दिला आहे.

स्टार टीव्हीने २०१६ च्या टी -२० विश्वचषक स्पर्धेचे प्रसारण हक्क मिळवले होते. त्याची रक्कम अदा करताना १६० कोटी रुपये टीडीएस म्हणून कापून घेतले होते. बीसीसीआयने या रकमेची हमी घेतली होती. भारताकडून करमाफी मिळेल, असे बीसीसीआयने कळवले होते. मात्र करमाफी मिळाली नाही. त्यामुळे १६० कोटींच्या रकमेसाठी आयसीसीने तगादा लावला आहे. एन श्रीनिवासन हे त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष होते.

Leave a Comment