Thursday, March 30, 2023

क्रिकेटपटू धोनीचे आई वडील कोरोना पॉझिटिव्ह, रांचीत सूरू आहेत उपचार

- Advertisement -

नवी दिल्ली वृत्तसंस्था : संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यात सिनेजगतातल्या तसेच क्रिकेट विश्वातल्या अनेक सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे. स्टार क्रिकेटर एम .एस. धोनी याच्या आई-वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची बातमी समोर येत आहे. त्यांना उपचारासाठी रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, धोनीचे वडील पान सिंह आणि आई देविका देवी यांचा करुणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर सध्या रांची येथील रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती व्यवस्थित असून ऑक्सिजन लेवल देखील ठीक आहे त्यामुळे लवकरच हे दोघेही बरे होतील अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान यंदाच्या आयपीएल च्या मोसमात चेन्नई सुपर किंग्स चांगली कामगिरी करत आहे. अशातच आज चेन्नईचा कोलकत्याच्या टीम सोबत सामना होणार आहे हा सामना रात्री साडेसात वाजता होणार आहे.

देशातील रुग्णसंख्येची आकडेवारी

देशभरात करोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब मानली जात आहे. मागील 24 तासात देशात रेकॉर्ड ब्रेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात मागील 24 तासात मृतांची संख्या ही 2023 वर गेली आहे त्यामुळे कोरोना बाबत आता आणखी काळजी घेणे गरजेचे बनला आहे.याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात मागील 24 तासात दोन लाख 95 हजार 41 नवीन करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 56 लाख 16 हजार 130 इतकी झाली आहे. तसेच मागील 24 तासात देशात एक लाख 67 हजार 457 जळ करूनच या उपचार आतून बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत देशात एक कोटी बत्तीस लाख 76 हजार 39 जणांनी  यशस्वीरीत्या मात केली आहे.

मृत्यूंची संख्या ही वाढताना दिसत आहे आतापर्यंत देशात एक लाख 82 हजार 553 जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. तर सध्या देशात 21 लाख 57 हजार 538 जणांवर कोरोना वरील उपचार सुरू देशात आतापर्यंत 13 कोटी 1 लाख 19,310 व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.