भयानक!! आर.आश्विनच्या घरातील 10 जणांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मधून अचानक ब्रेक घेतलेल्या फिरकीपटू आर अश्विनच्या कुटुंबात तब्बल 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे यात ४ लहानग्यांचाही समावेश आहे. अश्विनची पत्नी प्रिथी अश्विन हिने ट्विट करुन कुटुंबावर ओढावलेली भीषण परिस्थिती सांगितली आहे.

आर अश्विननची पत्नी प्रीतीने कोणत्या परिस्थितीतून आम्ही सध्या जात आहोत त्याची माहिती ट्वीट करून दिली आहे. ‘एका आठवड्यापासून आमच्या कुटुंबातील 6 मोठे तर 4 मुलं अशा 10 जणांना मिळून कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.’

मला वाटतं या आजारानंतर येणारा शारीरिक अशक्तपणा आपण भरून काढू शकतो, परंतु मानसिक आरोग्य स्थिर होण्यास वेळ लागेल. पाचव्या ते आठव्या दिवसापर्यंतचा कालावधी माझ्यासाठी सर्वात वाईट होता. मदतीसाठी सर्वजण जवळ होते. पण परिस्थिती अशी असते की सगळे सोबत असूनही तुमच्यासोबत कुणीचं नसत. असे ट्विट करत अश्विनच्या पत्नीने कुटुंबावर ओढावलेल्या कठीण परिस्थितीबाबत माहिती दिलीये

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like