कराडमध्ये पुन्हा एकदा गँगवाॅरचा थरार; गुन्हेगारावर केसकर्तनालयात खूनी हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड  शहरातील शाहू चौक येथे रविवारी रात्री गुन्हेगार अभिनंदन झेंडे यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. मात्र जीवाच्या आकांताने झेंडे याने पोलिसांना फोन लावला अन् पोलिसांच्या कार्यतत्पेमुळे जीव वाचला. सदरची घटना रविवारी (दि.१२) रात्री सव्वा सहाच्या सुमारास घडली असल्याची माहिती पोलिस उप अधीक्षक सुरज गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील शाहू चौक येथे खून करण्याच्या उद्देशाने अनिकेत रमेश शेलार  (वय 21 वर्षे रा.शास्त्रीनगर मलकापूर ता.कराड), इंद्रजित हणमंतराव पवार (वय 23 वर्षे, रा. लाहोटीनगर मलकापूर ता. कराड), सुदर्शन हणमंत चोरगे (वय 20 वर्षे रा.कोयनावसाहत ता.कराड) , आशिष अशेाक पाडळकर (वय 33 वर्षे, रा. सनसिटी मलकापूर ता.कराड) या चौघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या दक्ष कामगिरीमुळे गजाआड करण्यात आले.  रविवारी ( दि.11) रात्री सव्वासातच्या  सुमारास एक सिल्वर रंगाची (एमएच 11 बीवाय 4040) या पोलो वाहन शाहू चौकात लावून एका केसकर्तनालय दुकानाचे बाहेर खूनी हल्ला करण्याचे उद्देशाने हातात कोयता, विळा, दांडके घेवून गाडीत बसलेले होते.

अभिनंदन झेंडे व त्याचे मित्र केसकर्तनालय दुकानात नाष्टा करून बाहेर पडताच सदर चारही इसमांनी झेंडे व त्याचे मित्र यांच्याशी वादविवाद करून झेंडे याचे गळ्यावर कोयत्याने हल्ला केला. अभिनंदन झेंडे यांने सदरचा घाव चुकवून जवळच आपल्या केसकर्तनालय दुकानात मित्रासह जावून लपून बसला व आतून कडीलावून घेतली. संशयित आरोपींनी यांनी केशकर्तनाल दुकानाच्या दरवाजावर कोयता मारून बाहेर ये, असे ओरडत  होते. यावेळी अभिनंदन झेंडे यांच्या मित्राने दुकानातून कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांना फोन करून हल्ल्याबाबत माहीती दिली. यावेळी क्षणाचाही विलंब न करता सपोनि विजय गोडसे व त्यांचे पथक शाहू चौकात क्षणार्धात पोहोचले व सदर चौघांनाही हत्यारासह ताब्यात घेतले.  पुढील तपास सपोनि अमित बाबर करत आहेत. 

डीवायएसपी सुरज गुरव म्हणाले, कराड शहरात होणाऱ्या गुन्हेगारी हालचालीवर माझ्यासह, कराड शहर पेालीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक  बी.आर.पाटील यांचे विशेष लक्ष असून वेगवेगळी पथके व गोपनीय यंत्रना सतर्क करून प्रत्येक गुन्हेगारी टोळी व गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष आहे.

कराड शहरातील गुन्हेगारी वर्चस्व मोडुन काढण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व मा.अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी चार्ज घेतल्यापासुन कंबर कसली आहे. त्यांनी अनेकजनांना मोका, तडीपारी प्रस्तावामुळे कराड शहरातील गुंडगिरी नियंत्रणात आणली आहे. पोलीसांनी केलेल्या या कारवाईमुळे अनेक गुंड कराड शहर सोडुन पसार झालेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जे गुंड जामीनावर सुटले आहेत. त्यांची गुन्हेगारी कृत्ये सुरु आहेत. त्यावर पोलीसांची करडी नजर असुन, अनेकांविरुध्द तडीपारीचे प्रस्ताव सादर करुन तडीपार करण्यात आलेले आहे. तसेच काही गुंड प्रवृत्तींचे इसमांचे अभिलेख तयार करुन तडीपारीचे प्रस्ताव सादर करुन, त्यांना लवकरच तडीपार करण्यात येणार आहे. कराड शहर व परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची गुंडगिरी चालणार नाही याबाबत पोलीस प्रशासन अत्यंत संवेदनशील आहे.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, वरिष्ठ पेालीस निरीक्षक बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस हवालदार नितीन येळवे, देवा खाडे, संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, चव्हाण व होमगार्ड अमोल जंगम, अक्षय निकम, गणेश खुडे, चंद्रशेखर म्हेत्रे  यांच्या पथकाने केली आहे.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment