जीवाला हानिकारक असलेल्या गर्भपाताची औषधी देणाऱ्या बीएचएमएस बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : माळीवाड्यात एका बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा डॉक्टर गर्भपाताची औषध देत होता. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे.

दीपक शांतीलाल कुन्कुलोल जैन असे या बोगस डॉक्टरांचे नाव असून याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कुन्कुलोल जैन हा बीएचएमएस झालेला असून तो महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती.

हाती आलेल्या माहिती नुसार 5 जानेवारी रोजी प्रशासनाने या आरोपीच्या सिद्धिविनायक क्लिनिकमध्ये एका महिलेला पाठवून गर्भपाताच्या औषधी खरेदी केल्या होत्या. त्यानंतर या औषधींची फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणी करण्यात आली असता ही औषधे धोकादायक असल्याचा अहवाल प्रशासनाला मिळाला होता. त्यावरून दहा जुलै रोजी दौलताबाद पोलीस ठाण्यात या नराधमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक बचाटे करत आहेत.

दहा दिवसांपूर्वी माळीवाडा भागात अजून एका बोगस डॉक्टरांना अटक केली होती. आरोग्य अधिकारी प्रशांत दाते व पथकाने कारवाई केली होती. दोन जुलै रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. बाजार सावंगी येथे राहणाऱ्या वासुदेव गोपाल बाला असे या डॉक्टरांचे नाव होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Comment