विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी साताऱ्यात पतीसह सासू सासऱ्यावर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा येथील अनेक कारणावरून पत्नीने जाचहाट करणाऱ्या पतीसह सासू, सासऱ्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या लोकांवर जाचहाटाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पती राहुल शिवाजी शिंदे (वय- 37), सासरे शिवाजी नथू शिंदे (वय- 69), सासू शालन शिवाजी शिंदे (वय- 49, सर्व रा. संपदा हाैसिंग सोसायटी कर्मवीरनगर सातारा), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोनाली राहुल शिंदे (वय- 31, रा. सध्या रा. कोळकी, ता, फलटण, जि. सातारा) या विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तुझ्या वडिलांनी लग्नामध्ये मला सोने कमी घातले आहे. तू मला पसंत नव्हतीस. तू मला सोडचिठ्ठी दे. मला हे लग्न मंजूर नव्हतं, अस बोलून पतीने माझा मानसिक व शारीरिक छळ केला.

दुसरी मुलगीच झाल्यावर माझ्यावर संशय घेतला. तसेच प्रसूतीसाठी झालेला 90 हजारांचा खर्च तुझ्या माहेरच्या लोकांकडून घेऊन ये, अशी मागणी केली. त्याचबरोबर घराशेजारी राहणाऱ्या एका माणसाच्या विराेधात पोलीस ठाण्यात तक्रार दे तरच तुला नांदवतो, असे म्हणून मारहाण करत शिवीगाळही केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Comment