हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Crime News- दिवसेन दिवस बलात्काराच्या घटना वाढत निघाल्या असून , अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिंडोशी पोलिस स्टेशनच्या हद्दीतून हि घटना समोर आली आहे. 78 वर्षींय महिलेवर एका 20 वर्षांच्या मुलाने अत्याचार केला आहे. या महिलेला विस्मरणाचा आजार असल्यामुळे त्या युवकाने तिच्यावर अत्याचार केल्याचं सिद्ध झालं आहे. पण सीसीटीव्हीच्या मदतीने हि घटना उघड झाली आहे. तर चला या घटनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
78 वर्षींय महिलेवर अत्याचार (Crime News)-
मिळालेल्या माहितीनुसार, ती महिला घरात एकटीच होती. या महिलेला डिमेंशिया आणि मेमरी लॉसचा आजार आहे. त्यामुळे तिच्या घरी सीसीटीव्ही लावण्यात आला होता. महिलेला एकटी असल्याचं पाहून आरोपी घरात शिरला. त्यावेळी महिला तिच्या रुममध्ये झोपली होती. त्याचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले.
आरोपीला कोठडीची शिक्षा –
20 वर्षांच्या प्रकाश मोरिया याने 78 वर्षींय वृद्ध महिलेवर (Crime News)अत्याचार केला आहे. या वृद्ध महिलेला विस्मरणाचा आजार असून त्याचा फायदा घेत या युवकाने तिच्यावर अत्याचार केल्याचं उघड झालं आहे . घरातील सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आल्यानंतर युवकावर गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64(1) आणि 332(B) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला कोठडीची शिक्षा सुनावली आहे.
हे पण वाचा : पत्नीची हत्या!! तुकडे केले, कुकरमध्ये शिजवले; निवृत्त जवानाचे राक्षसी कृत्य
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज