धक्कादायक! डीलिव्हरी बॉयने केला तब्बल ६६ महिलांवर बलात्कार; ‘असा’ करायचा ब्लॅकमेल

हुगळी । एका केक डीलिव्हरी बॉयने तब्बल ६६ महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी आणि त्याला या गुन्ह्यात मदत करणाऱ्या एका साथीदाराला अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात या केक डीलिव्हरी बॉयचे कारनामे उघड झाल्यानंतर पोलीस प्रशासन चक्रावले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हुगळीच्या क्योटामधील त्रिकोण पार्कमध्ये राहणाऱ्या विशाल वर्मा या तरुणावर ६६ महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. चुचुडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, विशालला आणि त्याच्या साथीरादाराला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विशालच्या आईने मुलाने केलेल्या कृत्याची कबुली देतानाच, त्याला या गुन्ह्यांत साथ दिल्याचा आरोपही मान्य केला आहे. पोलिसांनी विशालविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

असा करायचा ब्लॅकमेल
मिळलेल्या माहितीनुसार, एका प्रख्यात कंपनीच्या उत्पादनांबाबत फिडबॅक घेण्याच्या बहाण्याने हा डिलिव्हरी बॉय असलेला विशाल महिलांना व्हिडिओ कॉल करायचा. व्हिडिओ कॉल करून त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवायचा आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करायचा. या महिलांना तो शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडायचा. या घटनेवरून महिला या घरातही सुरक्षित नाहीत, हेच सिद्ध झाले आहे. त्याने केलेले गुन्हे इतके गंभीर आहेत, की त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महिलांकडून होत आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like