हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Crime News – तेलंगणामधून एक हादरून टाकणारी घटना समोर आली आहे. एका निवृत्त लष्करी जवानाने आपल्या पत्नीची निर्दयी हत्या करून तिच्या मृतदेहाचे बारीक तुकडे केलेत. यानंतर त्याने ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवून तलावात फेकून दिले. जेव्हा महिलेच्या आई-वडिलांनी ती सापडत नसल्याची तक्रार पोलीस स्टेशनला केली , तेव्हा या घटनेबद्दलची माहिती समोर आली . तर चला या घटनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
चौकशी दरम्यान निर्दयी घटना समोर –
हि घटना तेलंगणातील हैदराबाद रंगारेड्डी जिल्ह्यातील आहे. मृत महिला बेपत्ता असल्यामुळे तिचे कुटुंब माहेरी गेले, पण ती तिथंही नव्हती . आरोपीने भांडण झाल्यामुळे पत्नी घरातून निघून गेली असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या महिलेचे कुटुंब आणि आरोपी पती, पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. नंतर पोलिसांना चौकशी दरम्यान मृत महिलेच्या पतीवर संशय आला , हे झाल्यानंतर ती हत्त्या त्यानेच केली आहे हे सिद्ध झाले.
मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले (Crime News) –
पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता, “आमच्या दोघांमध्ये सारखी भांडणे होत होती. 15 जानेवारी रोजीही आमच्यात भांडण झाले आणि त्यानंतर रागाच्या भरात पत्नी माधवीची हत्या केली. दुसऱ्या दिवशी मृतदेहाचे तुकडे केले आणि ते कुकरमध्ये शिजवले. नंतर हाडे बारीक करून मृतदेहाचे तुकडे तलावात टाकले ” असे सांगून त्याने आपला गुन्हा कबूल केला .
आरोपी पती निवृत्त लष्करी जवान –
घटना हैदराबादच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील मिरपेट भागात घडली आहे. या हत्येतील आरोपी पती हा निवृत्त लष्करी जवान असून, त्याने स्वतःच्या इच्छेने निवृत्ती घेतली होती. निवृत्ती घेतल्यानंतर आरोपी डीआरडीओमध्ये आउटसोर्स्ड सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. तसेच त्याला दोन मुले आहे. पत्नीशी झालेल्या भांडणानंतर 15 जानेवारी रोजी तिची हत्या (Crime News) केली आणि 16 जानेवारीला मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यानंतर 18 जानेवारी रोजी ही क्रूर घटना समोर आली आहे.
हे पण वाचा : प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना कारावासाची शिक्षा; ‘ते’ प्रकरण आले अंगलट
बँकिंग ते आरोग्य; AI चे हे कोर्सेस करून कमवा लाखात पगार