उस्मानाबामध्ये ४० रुपयाचे बिल न दिल्याने खून

उस्मानाबाद प्रतिनिधी | माणसाचे जीवन अमूल्य असते त्याची किंमत कशानेच मोजता येऊ शकत नाही असे बोलले जात असले तरी देखील नेमक्या त्या जीवनाची किंमत समजलेलीच नसते. अगदी किरकोळ कारणावरून एखाद्याचा जीव घेतला जात असेल तर आपण खर्च माणसे आहोत की जनावरे आहोत असा प्रश्न उपस्थित होतो. जनावरांना देखील दया-माया असते ते देखील किती भावनिक असू शकतात यांची अनेक उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. परंतु माणूस नावाचा प्राणी मात्र किती हिंसक आणि संवेदना हीन असू शकतो याचा परिचय देणारी घटना उस्मानाबाद शहरात घडली आहे.

उस्मानाबाद शहरातील एंनजॉय नेट कॅफे येथे उस्मानाबाद तालुक्यातील घाटगरी गावचा ३६ वर्षीय दशरथ गेमा पवार हा काही इंटरनेटच्या कामासाठी आला होता. तिथे त्याने नेटचा वापर केला. त्याने वापरलेल्या नेटच बिल ४० रुपये झालं. परंतु दशरथने हे ४० रुपयांचं बिल दिल नाही. त्याचाच राग कॅफेचा मालक असणारा विनोद लंगळे याला आला. त्याचा इतका राग अनावर झळा की त्याने थेट दशरथ वर हल्लाच चढवला. हा हल्ला इतका गंभीर होता की दशरथ याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली असून याबाबत उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. परंतु दशरथच्या घरच्यांना घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलीस स्टेशनच्या दारात एकाच आक्रोश केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com