एसटी पण ठरू शकते सिरीयल किलर.. आतापर्यंत घेतले १२ बळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | आतापर्यंत आपण एखादा मानसिक रुग्ण, गुन्हेगार अथवा दहशतवादी यांना सिरीयल किलर म्हणून पहिले असेल. पण जर तुम्हाला निर्जीव वस्तू सिरीयल किलर असू शकते का ? असा प्रश्न विचारला तर काय उत्तर देणार.. हो कि नाही. तर या प्रश्नच उत्तर हो आहे असं म्हणता येऊ शकत कारण आपण ज्या एसटी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत ती एसटी खरंच सिरीयल किलर आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण या एकाच एसटीने आत्तापर्यंत सुमारे १२ लोकांचा जीव घेतला आहे. एम एच 14 बीटी  1532 हा क्रमांक असलेल्या या बसला चालक-वाहकाने रस्त्यावर आणावे कि नाही अशी परिस्थिती आहे. कारण जर या बसचा इतिहास पाहीला तर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

2012 मध्ये पुण्यात संतोष माने या चालकाने बेदरकारपणे हीच बस चालवून 9 जणांचा बळी घेतला होता. त्यानंतर 2017 मध्ये कोल्हापूरातील उमा टॉकीज चौकात या बसचा ब्रेक फेल होऊन दोन जणांचा बळी गेला होता तर दहा वाहनांना ठोकर दिली होती.रविवारीही याच एसटी बसचा कोल्हापूरातील आदमापुर इथं अपघात होऊन एक महिला ठार झालीय.त्यामुळे या एसटी बसची धास्ती सगळ्यांनीच घेतली आहे. नुकत्याच झालेल्या या अपघातामुळे या बस बाबत उलट सुलट चर्चा व्यक्त होऊ लागल्या आहेत. तर अनेक जण अपघाताच्या या मालिकेने हादरून गेले आहेत. त्यामुळे आता हि बस किती काळ रस्त्यावर धावत राहणार आणि किती जणांना तिच्यामुळे आपले प्राण गमवावे लागणार असा प्रश्न सर्वजण विचारात आहेत.

Leave a Comment