चोरटयांनी पोलिसांच्या अंगावर घातली जीप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कल्याण प्रतिनिधी | कल्याणमधील संतोषी माता रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी पोलिसांच्या अंगावर जीप घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात डीसीपी स्कॉडचा एक पोलिस जवान गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहितीनुसार, कल्याणमधील संतोषी माता रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री बँकेत चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांना पोलिसांनी हटकल असता, आरोपींनी महिंद्रा जीप पोलिसांच्या अंगावर घातली. चोरट्यांच्या या हल्ल्यात डीसीपी स्कॉडचा एक पोलिस गंभीर जखमी झाला असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. पोलिसांच्या अंगावर जीप घातल्यानंतर सर्व चोरटे फरार झाले. या चोरट्यांचा पुढील तपास महात्मा फुले पोलिस ठाण्यातील पोलिस करत आहेत.

Leave a Comment