‘टिक-टॉक’ फेम आकाशने केली आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रतिनिधी सोलापूर| टिक-टॉक च्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या असणाऱ्या आकाश जाधव (वय 27, रा. पटवर्धन चाळ, रामवाडी, सोलापूर) याने रेल्वे खाली आत्महत्या केली. रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.
आकाश जाधव हा कार ड्रायव्हर म्हणून काम करत होता.

टिकटॉक अँपवर आपल्या अभिनयाचे व्हिडीओ करून टिक-टॉक फेम अशी प्रसिद्धी आकाशने मिळवली होती. त्याला चाहणारे मोठ्या संख्येने त्याचे फॉलोअर होते. काल रविवारी रात्री आकाशने आत्महत्या करण्याच्या हेतूने विष प्राशन केले होते. तसेच झोपेच्या गोळ्या खाऊन शेवटी तो रेल्वे रुळावर जावून झोपला.

काही तरुणांनी त्याला रुळावर झोपलेला पाहून आरडाओरड सुरु केली. तरुणांनी हटकल्यानंतर आकाश काही अंतरावर जावून पुन्हा रेल्वे रुळावर झोपला. अखेर रेल्वे त्याच्या मानेवरून जाऊन त्याचा मृत्यू झाला. आकाशने आत्महत्या केल्याचे कळताच कुटूंबीयांसह मित्रांना धक्का बसला. आकाश विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. आकाशने आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही.

Leave a Comment