तुमसर शहरात सराईत गुंडाची निर्घृण हत्या

भंडारा प्रतिनिधी| भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील तुमसर शहरातील कालीमाता मंदीर जवळ एका सराईत गुंडाची कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण हत्या झाल्याची थरारक घटना बुधवार रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान घडली. बाबू बॅनर्जी (३२) रा. जगनाडे नगर, तुमसर असे मृतकाचे नाव आहे. तुमसर शहरात घडलेली ही थरारक घटना शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाबू बॅनर्जी हा घराकडून येत असताना काली मंदीर जवळ अज्ञात हल्लेखोरांनी चाकु व कुऱ्हाडीने त्याचे पोटावर सपासप वार केले. क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळून जागीच गतप्राण झाला. घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी बिसेन व पो.नि.सिडाम यांनी घटनास्थळ गाठले.

मृतक बाबू बॅनर्जी हा गुंड प्रवृत्तीचा होता. त्याला तडीपार केले गेले होते. एका प्रकरणात त्याला ५ वर्षाची शिक्षा झालेली होती. या घटनेने पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकलेले आहे. हत्या कुठल्या कारणाने झाली हे गुलदस्त्यात असले तरी बाबू बॅनर्जी याची हत्या जुन्या वादातून वचपा काढला असावा अशी चर्चा शहरात केली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com