पाथरी-मानवत मार्गावर दोन वाहनात समोरासमोर धडक; एक ठार एक जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतीनिधी । गजानन घुंबरे
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर गुरुवारी रात्री वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या तयारीत असणाऱ्या पिकअप जीप व समोरून येणाऱ्या मॅक्स जीपमध्ये झालेल्या जोरदार धडकेत एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला असून यामध्ये जीपचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर पाथरी-मानवत मार्गावर अंजली लॉन्स समोर गुरुवार दि.२० फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ८ .३० च्या दरम्यान पाथरीकडे येणारी पिकअप जीप क्रं. एम.एच. २१ एक्स २७२१ व मानवतकडे जाणाऱ्या मॅक्स जीप क्रमांक एम.एच. २३ ई ३१६९ यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाला .यात मॅक्स जीप मधील एक ठार तर एक जण गंभीर रित्या जखमी झाला आहे. मॅक्स जीपमध्ये अपघात झाला त्यावेळी चौघेजण असल्याची माहिती आहे.अपघाता नंतर मॅक्स जीप पलट्या घेत अपघात स्थळापासून सुमारे ३०० मीटर पुढे गेली होती. यामध्ये जीपचा अक्षरशः चुराडा झाला. तर पिकअप जीपचा चालक घटनास्थळावरून पळून गेला होता.

अपघातात मॅक्स जीपमधील चौघापैकी शेख सलमान शेख इस्माइलचा (वय २३ )रा.सारोळा ता.पाथरी याचा जागीच मृत्यु झाला तर कैलाश मूंगे (वय २१)रा. टाकळगव्हाण ता. पाथरी हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने रुग्णवाहीकेतून पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी घटनास्थळी पाथरी पोलीसांनी येत अपघातग्रस्तवाहने हटवून वाहतुक मोकळी केली. दरम्यान पोलीसांनी पंचनामा केला असुन तपास चालू आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment