यवतमाळमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात, ४ ठार तर २४ जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ । महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसेन सोलापूरहून झारखंडला निघालेल्या स्थलांतरीत मजुरांच्या बसला आज पहाटे यवतमाळमध्ये अपघात झाला. या भीषण अपघातात ४ मजूर जागीच ठार, तर २४ जखमी झाले आहेत. जखमींना अर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नजिक कोळणव येथे आज पहाटे साडे चारच्या सुमारास मजुरांच्या बसचा अपघात झाला. ही बस सोलापूरहून झारखंड राज्याकडे निघाली होती. बसमध्ये एकूण ३२ मजूर होते. नागपूरच्या दिशेनं जात असताना समोरून आलेल्या भरधाव ट्रकनं बसला धडक दिली. यात ४ जण जागीच ठार झाले. तर, २४ जखमी झाले. हा अपघात नेमका कशामुळं झाला हे कळू शकलेलं नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून स्थलांतरीत मजुरांचे हाल सुरूच आहेत. हातचे काम गेल्यानं अनेक मजूर कामगार आता गावाकडे पलायन करायला विवश झाले आहेत. केंद्र सरकारनं प्रवासाची मुभा देऊन सुद्धा प्रशासन यंत्रणा तोकडी पडत असल्याचा फटका मजुरांना बसला आहे. त्यामुळं अनेकांनी पायी चालत घर गाठण्याचा प्रयत्न केला होता. या प्रवासातही अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला होता. औरंगाबादमध्ये अलीकडेच रेल्वे रुळावरून गावी निघालेल्या १६ मजुरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment