यवतमाळ जिल्ह्यातील बीबीत महिलांनी गावठी हातभट्टीवर केला हाथ साफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ प्रतिनिधी। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील पोफाळी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बिबी इथं मागील अनेक दिवसापासून गावठी दारू विक्री  सुरू होती. या गावठी दारूच्या हातभटीवर बीबीच्या महिलांनी धाड टाकली. या महिलांनी पोलिसांच्या मदतीनं हातभट्टी उद्धवस्त केली.

दारुमुळ अनेकांचा संसार उध्वस्त होत असून भांडण-तंटे मोठ्या प्रमाणात सुरु होते.  दारू बंद करण्यासाठी बिबी येथील महिलांनी पुढाकार घेऊन पोफाळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांना पोलीस स्टेशनला दारू विक्री करणाऱ्या लोकांची  माहिती दिली. या माहितीवरून पोफाळी ठाणेदार कैलास भगत यांनी बिबी गावात दारु बंद करण्यासाठी गावातल्या नागरीकांनी सहकार्य करण्याच आवाहन केले.

याआधी दारू विक्रेत्याला दारू बंद करण्याची सुचना दिली. मात्र तरी दारू विक्रेत्यांनी सांगूनही दारू बंद केली नाही. त्यामुळ नव तरुण मंडळ आणि महिलांनी गावातील ४ ते ५ दारु विक्रेत्यांच्या घरी जाऊन दारुचा मोह, दारू गाळण्याच साहित्य असा मुदेमाल जप्त करत पोलिसांच्या हवाली केला. अवैध दारू पकडण्यासाठी सामान्य महिलांना पुढाकार घ्यावा लागत असल्यान पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे .

Leave a Comment