धक्कादायक! कोयनानगर येथे चार चाकी गाडी २०० फूट दरीत कोसळून धबधब्यात गेली वाहून, दोघांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण – कोयनानगर परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने अोढे नाले भरुन वाहत आहेत. याच भरुन वाहणार्‍या नाल्यात चालकाला अदांज न आल्याने शनिवारी रात्री पर्यटकांची आय २० कार हूंबरळी जवळील पाबळनाला धबधब्यात वाहून गेली. यात दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप ( पहा व्हिडीओ )

अधिक माहिती अशी की, कोयनानगर जवळ असलेल्या हुंबरळी (ता.पाटण) येथील पाबळनाला या ठिकाणी शनिवारी रात्री कारवरील चालकाला पाण्यामुळे अंदाज न आल्याने त्याचा कारवरील ताबा सुटल्याने कार दोनशे फूट पाबळनाला धबधब्यात कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

नितीन शेलार (रा.सातारा) याच्यासह अन्य एकाचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच कोयनानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी , कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सातारा येथून आ.शिवेन्द्रराजे भोसले ट्रेकर्स व रेस्कू टीम कोयनानगर मध्ये दाखल झाली असून मुसळधार पावसात रेस्कू ऑपरेशन सुरु आहे अशी माहिती कोयनानगर पोलीस स्टेशनचे सपोनि एम.एस भावीकट्टी यांनी हॅलो महाराष्ट्र सोबत बोलताना दिली.

Leave a Comment