खबळजनक! लॉकडाउन कालावधीत रायगड जिल्ह्यात ६५ जणांनी केली आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायगड । कोरोनाची महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे आता आर्थिक आणि सामाजिक परिणाम दिसून येत आहेत. त्याचबरोबर या परिस्थितीचे मानसिक दुष्परीणामही दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात गेल्या ४ महिन्यात ६५ जणांनी आत्महत्या केली असल्याचे वृत्त लोकसत्ता या वृत्तपत्राने दिले आहे.

लोकसत्ता वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, रायगड पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या हद्दीत गेल्या ४ महिन्यात ६५ आत्महत्यांची नोंद झाली. यात मार्चमध्ये १५, एप्रिलमध्ये ११, मेमध्ये २४ तर जूनमधील १५ आत्महत्यांचा समावेश आहे. या आत्महत्यांमागची कारणे वेगवेगळी असली त्याला लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थिती जबाबदार आहे. समाजात वाढत्या मानसिक ताणतणाव आणि नैराश्याचे हे उदाहरण आहे.

करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. ४ महिन्यांनंतरही लॉकडाऊन पुर्णपणे उठू शकलेला नाही. या लॉकडाऊनचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम सर्वत्र दिसून येत आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रांना या लॉकडाऊनची झळ पोहोचली आहे. बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे. घरखर्च कसा चालवायचा अशी विवंचना अनेकांना भेडसावू लागली आहे. त्यामुळे मानसिक ताणतणाव आणि नैराश्य वाढण्यास सुरवात झाली आहे. यातून आत्महत्येसारखी टोकाची पाऊले उचलली जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment