दाऊदचा निकटवर्तीय गजाआड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | कुख्यात दाऊद इब्राहीमचा भाऊ अनिस इब्राहीम याचे आर्थिक व्यवहार सांभाळणार्‍या मोहम्मद अल्ताफ अब्दुल लतीफ सईदला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अल्ताफला केरळ राज्यातील कुन्नूर विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. तो दुबईवरून भारतात आला होता.

गँगस्टर अनिस इब्राहीम हा एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावत होता. हॉटेल व्यावसायिकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने अनिसचा खास हस्तक रामदास रहाणे त्याला धमकी देऊ लागला. अखेर हॉटेल व्यवसायिकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणात डी गँगच्या हवाला ऑपरेटरसह चार जणांना बेड्या ठोकल्या. चौघांवरही मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन खंडणी विरोधी पथकाने अनिसच्या कारवायांचा माग काढण्यास सुरुवात केली.

नवी मुंबईतील रहिवाशी असलेला अल्ताफ हा सध्या दुबईत वास्तव्यास असून तो अनिस इब्राहीमचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याची महत्वपूर्ण माहिती खंडणी विरोधी पथकाच्या हाती लागली. अल्ताफच्या हालचालींवर नजर ठेवत खंडणी विरोधी पथकाने सोमवारी दुबईतून केरळ राज्यातील कुन्नूर विमानतळावर उतरताच त्याला ताब्यात घेतले. अल्ताफला मुंबईत आणून कसून चौकशी केल्यानंतर त्याचा गुन्ह्यातील सहभाग उघडकीस येताच गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्या. न्यायालयाने अल्ताफला १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF

WhatsApp Nambar – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur

तर मी शिवसेनेची हमी घेतो : रावसाहेब दानवे

पूराने केलेला विध्वंस बघून भिडे गुरुजींना आले रडू

पूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिवसेनेने पाठवले १०० डॉक्टर

महाराष्ट्र भाजपच्या लोकप्रतिनिधींनी १ महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना द्यावे : चंद्रकांत पाटील

पूरग्रस्तांना धमकी द्यायला चंद्रकांत पाटील हे जनरल डायर आहेत का : राष्ट्रवादी

राहुल गांधीनी दिली त्यांच्या मतदारसंघातील पूरग्रस्तांना भेट

पूरग्रस्तांसाठी संभाजीराजे करणार ५ कोटींची मदत

Leave a Comment