सुशांत आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी होणार का? अमित शाह यांनी दिलं ‘हे’ उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुत याने गळफास लावून आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, बिहारमधील माजी खासदार आणि जन अधिकार पक्षाचे नेते पप्पु यादव यांनी सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. सुशांत सिंह राजपूत हा कधीही आत्महत्या करू शकत नाही. त्याची हत्या करण्यात आली आहे,” असं पप्पु यादव यांनी म्हटलं. तसंच त्यांच्या हत्येची CBI चौकशी करावी अशी विनंती त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना केली होती. त्यांच्या या विनंतीचा स्विकार करत अमित शाह यांनी त्यांना पत्र पाठवलं आहे

अमित शाह यांनी पप्पु यादव यांच्या विनंतीवर प्रतिक्रिया देण्यासाठी एक पत्र पाठवलं आहे. या पत्राचा फोटो पप्पु यादव यांनी ट्विट केला आहे. “पप्पू यादव आपण पाठवलेलं पत्र १६ जून २०२० रोजी मिळालं. आपण अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येची CBI चौकशी करण्याची विनंती केली आहे. तुमच्या पत्राचा विषय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाशी संबंधित आहे. त्यामुळे ते पत्र संबंधित मंत्रायलाकडे पाठवण्यात येत आहे.” असं उत्तर अमित शाह यांनी पत्रातून दिलं आहे.

सुशांत सिंह राजपूतनं मुंबईतील वांद्रेमध्ये असलेल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचबरोबर त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नसलं, तरी अनेक तर्क लावले जात आहे. दरम्यान, बिहारमधील माजी खासदार आणि जन अधिकार पक्षाचे नेते पप्पु यादव यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात मोठं विधान केलं आहे.

हे पण वाचा –

लाॅकडाउनमध्ये वाढली Sex Toys ची मागणी! कंडोमची ऑनलाईन विक्री तेजीत

धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग

लाॅकडाउनमध्ये पत्नीचा १० हजारात केला २ तासांसाठी सौदा! पुढे झालं असं काही

लज्जास्पद! नांदेडमध्ये शिक्षकांनीच केला सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

उझबेकिस्तानमध्ये बसून ‘ती’ मुंबईत चालवायची SEX रेकेट; ८० हजार रेट!

Leave a Comment