आप आमदार नरेश यादव यांच्यावर प्राणघातक हल्ला; एका कार्यकर्त्याचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली निवडणूक निकालानंतर आम आदमी पार्टीवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पक्षाचे आमदार आनंद साजरा करण्याच्या मूडमध्ये असताना एका आमदारावर बुधवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात आपच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर महरौली आमदार नरेश यादव हे मंदिरात गेले होते. त्यांनतर तेथून ते परतत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. अशोक मान असं मृत्युमुखी पडलेल्या कार्यकर्त्याच नाव आहे. नरेश यादव यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे कुसुम खत्री यांचा १८१६१ मतांनी पराभव केला आहे. नरेस यादव यांना ६२४१७ मतं मिळाली आहेत.

हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार यादव म्हणाले, ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. मला हल्ल्याचे कारण माहिती नाही, परंतु हा अचानक करण्यात आलेला हल्ला आहे. जवळपास चार राउंड फायर करण्यात आले. ज्या वाहनात मी होतो, त्यावर हल्ला करण्यात आला. मला विश्वास आहे की जर पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केला तर हल्लेखोरास ओळखता येईल.

 

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment