औरंगाबाद शहरात कडक संचारबंदी; गल्लीबोळात पोलिसच पोलीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | पासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे कडेकोट पालन होताना दिसत असून रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.तर गल्लीबोलात देखील पोलीस पेट्रोलिंग करीत असल्याने शहरात खऱ्या अर्थाने लॉक डाऊन झाल्याचे दिसत आहेत. औरंगाबादेत कोरोनाने कहर केल्यामूळे प्रशासनाने 10 ते 18 जुलै दरम्यान संचारबंदी लागू केली.आज या संचारबंदीचा पहिला दिवस उजाडला आणि रस्तेच नव्हे तर जणू संपूर्ण शहरं निर्माणयुष्य झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

यापूर्वीच्या लॉकडाऊन दरम्यान मुख्य रस्ते ओस आणि गल्लीबोळात सर्वकाही सुरळीत असे चित्र होते. मात्र आज शहराचा आढावा घेतला असता रस्त्यावर ठिकठिकाणी  पोलीस ब्यारिकेट्स लावून पोलीसांचा फौजफाटा तैनात होता. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलोस निरीक्षक  हद्दी मध्ये कोणीही नागरिक विनाकारण बाहेर फिरणार नाही याची खबरदारी घेत होते. तर  गल्ली बोळात देखील पोलीसांची उपस्थिती होती.

मागील तीन महिन्यात नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला पूर्णपणे स्वीकारले नसल्याचे दिसत होते.त्यामुळे काही भागात  विनाकारण फिरणाऱ्या वर पोलिसांना लाठीचा  वापर करावा लागला होता.मात्र आजचे चित्र काही औरच होते,नागरिकांनी स्वतःहून घराबाहेर येणे टाळले त्यामुळे हा खऱ्या अर्थाने जनता कर्फ्यु असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

पोलीस आयुक्तसह  पोलीसदल  रस्त्यावर…

मागच्या लॉकडाऊन दरम्यान शहरातील अनेक भागात पोलीस पोहोचले न्हवते.त्यामुळे नागरिकांचा मुक्त संचार पाहायला मिळाला होता.या संचारबंदीचा पोलिसांनी चंगला नियोजन केल्याचे दिसते.पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद हे स्वतः संपूर्ण शहरभर फिरून या संचारबंदीवर लक्ष ठेऊन आहेत तर उप आयुक्त निकेश खटमोडे  यांनी सकाळीच 8 वाजता महावीर चौकाचा ताबा घेत ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली होती.  वरिष्ठ अधिकारी देखील आता रस्त्यावर उतरल्याने विनाकारण फिरणाऱ्याची आता बिलकुल हयगय केले जाणार नाही हे स्पष्टपणे जाणवत आहे.

Leave a Comment