औरंगाबादमध्ये किरकोळ वादातून पेट्रोल ओतून एकाला पेटवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । किरकोळ वादातून औरंगाबादेतील विश्रांतीनगर भागात एका व्यक्तीच्या अंगावर तिघांनी पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.23) सायंकाळी घडली. या घटनेनंतर पेटवून देणारे पसार झाले असून, भाजलेल्या व्यक्तीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शेषेराव दगडू शेंगुळे (वय 54, रा. जयभवानीनगर) असे गंभीर भाजलेल्याचे नाव आहे.

शेंगुळे हे पंचावन्न ते साठ टक्‍के भाजले आहेत. याच अवस्थेत ते पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी तातडीने त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, अशी माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी दिली. घटनेनंतर पोलिस उपनिरीक्षक कापसे यांनी घाटी रुग्णालयात जाऊन शेंगुळे यांचा जबाब घेतला पुढील तपास सुरु आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

रतन टाटांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस; तरुणपणातील फोटोने घातला चांगलाच धुमाकूळ

#Budget2020: पीएफच्या (PF) नियमात होऊ शकतो मोठा बदल ! ‘या’ लोकांना होईल फायदा

#Budget2020: पेन्शन धारकांसाठी खुशखबर! अर्थसंकल्पात कर सवलत ५० हजार रुपयांपर्यंत वाढू शकते

Leave a Comment