ठाण्यामध्ये प्रतिष्ठित व्यक्तींच्या फोटोवर जादूटोण्याचा प्रकार उघडकीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी । लोणावळा तुंग गावातील इसार शाळेजवळ असलेल्या एका झाडावर मावळ तालुक्यातील प्रतिष्ठित ९ जणांच्या फोटोवर जादूटोणा, भानामती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जादूटोणा करण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये जमीनीची खरेदी विक्री करणाऱ्या प्रसिद्ध उद्योगपती तसेच तालुक्‍यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अशोकाच्या एका झाडाला ९ जंणाचे फोटो खिळ्याने ठोकून त्यावर लिंबु, काळ्या बाहुल्या, बिबा, टाचण्या लावून भानामती सारखा अघोरी प्रकार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर दाखल झाले. आणि झाडाला लावलेल्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींचे फोटो वरील लिंबू टाचण्या बाहुल्या काढून टाकल्या आहेत. या घटनेसंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलिसांना संबंधित व्यक्तींनी तक्रारी अर्ज दिला असून असे कृत्य करणाऱ्या वर जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

निर्जनस्थळी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटने मागचा असा खोडसाळपणा करणारा सूत्रधार कोण आहे. हे शोधण्याचे आवाहन लोणावळा ग्रामीण पोलीसांसमोर आहे.

Leave a Comment