२६४ कोटी खर्च करून बांधलेला पूल जेव्हा २९ दिवसांत वाहून जातो; पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा । बिहार राज्य सध्या दुहेरी संकटामध्ये सापडलं आहे. एकीकडे करोनाचा कहर तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरजन्य परिस्थिती. अशातच २९ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्घाटन केलेल्या पूलाचा एक भागच पाण्यात वाहून गेला. महत्वाची बाब म्हणजे हा पूल बांधण्यासाठी तब्बल २६४ कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. दरम्यान, इतके पैसे खर्च करून बांधलेला पूल केवळ २९ दिवस टिकल्याने बिहार मधील
भाजपच्या पाठिंब्याने सत्तेत बसलेल्या नितीश सरकारला टीकेला समोर जावं लागत आहे.

हा पूल वाहून गेल्यानं विरोधकांनी नितीश कुमार सरकारला चांगलचं धारेवर धरलं आहे. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना टोला हाणला. “८ वर्षांमध्ये २६३.४७ कोटी रूपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या पूलाचं नितीश कुमार यांनी १६ जून रोजी उद्घाटन केलं होतं. तो पूल २९ दिवसांनंत वाहून गेला. खबरदार जर त्यांना कोणी भ्रष्टाचारी म्हटलं तर. हा तर केवळ चेहरा दाखवण्याचा शगून आहे. एवढ्याची तर त्यांच्याकडे उंदीर दारू पिऊन जातात,” असं म्हणत त्यांनी नितील कुमारांना टोला लगावला.

दरम्यान, १६ जून रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या पूलाचं उद्घाटन केलं होतं. या पूलाची निर्मिती २०१२ मध्ये करण्यात आली होती. तसंच यासाठी २६४ कोटी रूपयांचा खर्च आला होता. दरम्यान गोपालगंजमध्ये बुधवारी ३ लाख क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा प्रवाह होता. या पाण्याच्या प्रवाहामुळेच हा पूल वाहून गेल्याचं सांगण्यात येत आहे. नदीवर असलेला हा पूल सध्या पूल वाहून गेल्यानं या पूलामुळे जोडल्या जाणाऱ्या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. लालछापर, मुजफ्फरपूर, मोतिहारी आणि बेतिया या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment