गाणे वाजवण्यावरुन सख्ख्या भावाला भोसकले

नागपूर प्रतिनिधी | मोबाईलवर गाणे वाजवण्यावरुन सख्ख्या भावाने दुसर्‍याला भोसकल्याची धक्कादायक घटना शनिवारी नागपूर येथे घडली. सदर घटनेमुळे प्रतापनगर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सतत मोबाइलवर गाणे वाजविण्यावरून दोन सख्ख्या भावांमध्ये वाद झाला. लहान भाऊ ऐकतच नसल्याने रागाच्या भरात मोठ्या भावाने त्याच्या पोटात चाकू भोसकला. ही घटना प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्यीतील सिंधी कॉलनी, खामला परिसरात घडली. विनोद देवीदास धनवानी असे या प्रकरणातील फिर्यादीचे नाव आहे.

या प्रकरणातील आरोपी चेतन गौतम भट (३१) आणि त्याचा लहान भाऊ पीयूष गौतम भट (२५) हे दोघे त्यांच्याकडे भाड्याने राहत होते. दोघांमध्ये मोबाइलवर गाणे वाजविण्याच्या कारणावरून भांडण झाले. रागाच्या भरात चेतनने पीयूषच्या पोटात चाकूने वार केले. या प्रकरणी पोलिसांनी चेतनवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

साखरपुडा झालेल्या तरुणीचे प्रियकराने मोटारसायकलवर येऊन केले अपहरण

अल्पवयीन मुलीवर केले अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार

धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू

इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल

फेसबुक वरच्या मैत्रीणीला भेटण्यासाठी मुंबईच्या या पठ्ठ्यानं थेट पाकिस्तान गाठलं, पुढे झालं असं काही!!

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com