भाजप आमदार प्रशांत बंब आले अडचणीत; पैशांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । भाजप आमदार प्रशांत बंब (bjp mla prashant bamb) यांच्यावर गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. आमदार प्रशांत बंब यांच्यासह आणखी १६ जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत बंब हे गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. (case registered against 16 people including BJP MLA prashant bamb for embezzling Rs 15.75 crore)

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. प्रशांत बंब यांनी बनावट कागदपत्र तयार करून सभासदांची फसवणूक करत 15 कोटी 75 लाखांचा अपहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर कारखान्यातील सभासदांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला गेला. पोलिसांनी याची नोंद घेत प्रकरणाचा शोध सुरू केला असल्याची माहिती आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?
दरम्यान, गंगापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये यासाठी सभासदांनी काही पैसे जमा केले होते. ते पुन्हा कारखान्याच्या खात्यावर आले. तेव्हा ही रक्कम 15 कोटी 75 लाख होती. पण खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही असं कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितलं. यामुळे सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी सभासदांची डीआरटी कोर्टाकडे पैसे जमा केले होते. पण त्यानंतर विक्रीचा व्यवहार रद्द झाला. म्हणून कोर्टाकडून पुन्हा कारखान्याच्या खात्यामध्ये पैसे आले. यावर प्रशांत बंब आणि त्यांच्यासह काही जणांनी यावर कारखान्याचे पैसे नसल्याचं म्हटलं. या प्रकरणात 14 सभासदांची फसवणूक झाल्याचाही आरोप आहे.

यामुळे आता प्रकरणात पोलीस अधिक तपास करत असून प्रशांब बंब यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून न्याय मिळाला नाही तर कारयदेशीर कारवाई करू असंही सभासदांकडून म्हणण्यात आलं आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment