सीबीआयची टीम सुशांतच्या मुंबईतील वांद्रे इथल्या घरी दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला वेग आला असून सीबीआयची टीम आज सुशांतच्या वांद्रे इथल्या घरी पोहोचली आहे. याच घरात सुशांतसिंहचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. या भेटीत या प्रकरणातील काही धागेदोरे सापडतात का यासाठी सीबीआय कसून तपासणी करणार आहे.

शुक्रवारी सकाळी सीबीआयनं सर्वातआधी सुशांतच्या स्वयंपाकी निरजची चौकशी केली होती. त्याचा जबाब नोंदवून घेण्यासाठी त्याला गेस्टहाउसला नेण्यात आलं होतं. तीन तासांहून जास्त काळ ही चौकशी सुरू होती. सीबीआयचे अधिकारी सुशांतचा मित्र आणि मॅनेजर सिद्धार्थ पिठानी आणि स्वयंपाकी निरज यांना घेऊन आज सुशांतच्या घरी पोहोचले आहेत.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयला प्रथम सुशांतसिंह राजपूत याचा खून झाला का हे शोधावं लागेल. हत्येशी संबंधित काही तथ्ये आढळतात का याचा तपास करताना सीबीआय घटनास्थळाची कसून तपासणी करणार आहे. त्याच प्रमाणं गुन्ह्याचा तपास, शवविच्छेदनाचा अहवाल आणि फॉरेन्सिक तपास केला जाईल. या सोबतच सीबीआयला मुंबई पोलिसांकडूनही काही तपशील मिळवावा लागणार आहे. त्याच प्रमाणं सीबीआय टीमला फॉरेन्सिक आणि टीएफसीची मदत घ्यावी लागेल. तसंच सुशांतच्या घरी पुन्हा तो क्राइम सीन क्रिएट करण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment