11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील एका 11 वर्षीय मुलावर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.या प्रकरणी बार्शी शहर पोलिसात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ च्या कलाम ४ व ६ आणि भारतीय दंड संहिता १८६० च्या ३७७ आणि ५०६ या कलमानुसार बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, आपल्या मुलाला जेवायला नीट बसता येत नसल्याचे आईच्या लक्षात आले, त्यावेळी आई आणि वडिलांनी त्याची विचारपूस केली. तेव्हा पीडित मुलाने घडलेला प्रकार सांगितला. शेजारीच राहणाऱ्या २१ वर्षीय मुलाने दूध पिशवी आण मी तुला पैसे देतो या बहाण्याने बोलवून या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच कोणाला काही सांगू नकोस अशी धमकी दिली. ही घडलेली घटना ऐकून वडिलांनी अत्याचार करणाऱ्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. फिर्याद दिल्यानंतर तात्काळ बार्शी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली अधिक तपास पीएसआय जायपत्रे हे करीत आहेत.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment