कॉ.पानसरे यांच्या हत्येला पाच वर्षे ; तपास मात्र जैसे थे? (स्पेशल रिपोर्ट)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरही तपासात कोणतीही प्रगती नाही. मागील सरकारने तपासात लक्ष दिलं नसल्याने अद्याप तपास जैसे थे असल्याचं चित्र आहे. आज पानसरे कुटुंबीयांसह डाव्या चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली आरोपींना मोक्का लावा अशी मागणी केली तर सतेज पाटील यांनी पानसरे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात मागील सरकार कमी पडल्याचं स्पष्ट केलं.

जेष्ठ पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी अज्ञातांनी गोळ्या झाडल्या होत्या. २० फेब्रुवारी रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी १६ सप्टेबर २०१५ ला सांगली इथून समीर गायवाड ला अटक केली. समीर कडील चौकशी मधून समोर आलेल्या माहिती च्या आधारे २ सप्टेबर रोजी एस आय टी न डॉ वीरेंद्र तावडे याला की बी आय कडून ताब्यात घेतलं. या २९ नोहेबर ला एस आय टी न तावडे विरोधातील दोषारोपत्र न्यायालयात सदर केल.या मध्ये विनय पवार आणि सारंग आकोलकर यांचा पानसरे हत्ये मध्ये सहभाग असल्याच समोर आल. एसआयटी न पवार आणि आकोलकर यांच्या अटकेसाठी महाराष्ट्रा सह महाराष्ट्रा बाहेर शोध मोहीम राबवली.मात्र या दोघांना हि पकडण्यात तपास यंत्रणेला यश आल नाही. यापूर्वी पानसरे कुठुमबी यांनी अनेक वेळा पोलिसांची भेट घेऊन तपास जलद गतीने व्हवा म्हणून मागणी केली होती. शासनाच लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक महिन्यात 20 तारखेला निर्भय मॉर्निंग वॉक काढला जातो. आज जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यासह मेघा पानसरे, उमा पानसरे , ज्येष्ठ विचारवंत यामध्ये सहभागी झाले होते. पानसरे यांच्या निवासस्थानापासून हा मॉर्निंग वॉक काढण्यात आला.

कॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी पानसरे कुठुमबी यांसह अनुयायांची गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केलीय. तसच हत्या प्रकरणातील आरोपींचा जामीन रद्द करावा, सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी केलीय. पानसरे कुठूबियांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची शासकीय विश्रामगृहावर घेतली घेऊन ही मागणी केलीय

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाला पाच वर्ष झाली तरी मारेकरी सापडत नाहीत म्हणून पानसरे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच आज निर्भय मॉर्निंग वॉक देखील काढण्यात आला होता. यामध्ये ज्येष्ठ विचारवंत एन डी पाटील सहभागी झाले होते. पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी हा तपास गांभीर्याने करत असल्याचे म्हटले आहे. तसेच गेल्या पाच वर्षात हायकोर्टाला हस्तक्षेप करावा लागला… हा तपास कसा चाललाय त्यात व्यवस्थीत चाललाय का ? या प्रत्येक गोष्टीवर हायकोर्ट मॉनिटरिंग होतं म्हणजे शासन कमी पडल आहे हे स्पष्ट दिसतंय अस देखील सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. म्हणून आमची जबाबदारी निश्चितच आहे.पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडणं आणि हा तपास लॉजिकल आणला एन्ड ला पोहोचवणं आणि कारवाई करणे हे राहील दर आठवड्याला या तपासाचा माझ्या स्तरावर याचा आढावा घेणार असल्याचं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

गेल्या 5 वर्षात सरकारनं तपासात गांभीर्याने लक्ष दिलं असत तर नक्कीच पानसरे यांचे खरे मारेकरी सापडण्यात मदत झाली असती. आता नव्याने आलेल्या महाविकास आघाडी सरकार या कडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे पानसरेंचे आरोपी तात्काळ पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. अन्यथा तपास यंत्रणे वरून सामान्य नागरिकांचा विश्वास उडायला वेळ लागणार नाही.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment