डान्सबारच्या बाहेर पार्किंगच्या वादातून हाणामारी, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी । उल्हासनगर मध्ये एका डान्सबारच्या बाहेर जोरदार हाणामारीचा प्रकार घडला आहे. डान्सबाहेरच्या बाहेर असलेल्या पार्किंगच्या वादातून ही हाणामारी झाली असल्याचे समोर आले आहे. जवळपास ६ ते ७ जणांच्या टोळक्याने चौघांना जबर मारहाण केल्याचे उघड झाले आहे. हा मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान उल्हासनगर मध्ये एका डान्सबारच्या बाहेर एका टोळक्याकडून जोरदार हाणामारीचा प्रकार घडला. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री घडला प्रकार घडला आहे. काही लोकांनी डान्सबारच्या बाहेर असलेल्या पार्किंग मध्ये गाड्या लावल्या होत्या. यानंतर ६ ते ७ जण त्या जागेवर आले. त्यांच्या मध्ये गाड्या लावण्यावरून बाचाबाची झाली. आणि याचे पर्यावसान पुढे मारहाणीमध्ये झाले. ‘डान्सबार’च्या व्यवस्थापकाकडून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र वाद वाढत गेल्यामुळे कोणी ऐकण्यास तयार नव्हते. यावेळी बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती. दरम्यान डान्सबारच्या बाहेर हे घडलेले प्रकरण असल्यामुळे पोलिसांकडून याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. मात्र आत्तापर्यंत दोन ते तीन जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Comment