या माणसाने पेशाची लाज काढली ; ३० रुपयांची लाच घेताना डॉक्टर अँटी करप्शनच्या जाळ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | आपण लाचेचे अनेक प्रकार बघितले असतील मात्र हा प्रकार बघून आपण थक्क व्हाल. कारण या प्रकरणात सरकारी दवाखान्यातील डॉक्टराने उपचारासाठी फक्त ३० रुपयांची लाच मागितल्याची घटना घडली आहे. सदरची घटना सांगली जिल्ह्यातील कुरळप गावात घडली असून ऐतवडे गावच्या एका व्यक्तीला उपचारासाठी डॉक्टर ३० रुपयांची लाच मागत होता.

उपचारासाठी डॉक्टर ३० रुपयांची लाच मागत आहे अशी तक्रार संबंधित रुग्णाने जिल्हा लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्याना केली. अधिकाऱ्यांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेत त्या डॉक्टरवर कार्यवाहीचा सापळा रचला. अधिकाऱ्यांनी सापळा रचल्यावर हा डॉक्टर सापळ्यात सापडला. आज शुक्रवारी सकाळी हि कारवाही करण्यात आली आहे.

डॉ. नितीन बापू चिवटे (४६) असे अटक झालेल्या डॉक्टरचे नाव असून तो इस्लामपूरचा रहिवासी आहे. लाच मागण्याचे अनेक प्रकार आपल्या सभोवताली घडत असतात पण आपण त्याकडे सजकतेने बघत नसतो. मात्र या सर्वच प्रकाराकडे उघडपणे बघण्याची आवश्यकता आहे. कारण तेव्हाच व्यवस्था स्वच्छ होईल.

Leave a Comment