खळबळजनक! लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून ‘या’ चित्रपट अभिनेत्रीवर चाकू हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून मुंबईत चित्रपट अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर चाकूहल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालवीवर कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मालवीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या योगेशकुमार महिपाल सिंग या आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली होती. मात्र मालवीने लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याने तिच्यावर चाकू हल्ला केल्याचा आरोप आहे.

https://www.instagram.com/p/CBDdPKLB82v/?utm_source=ig_web_copy_link

हल्लेखोर आरोपीने फेसबुकवरुन मालवीशी संपर्क साधला होता. याआधी तीन-चार वेळा तो मालवीला भेटला होता. आपण निर्माता असल्याचे सांगून त्याने मालवीची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने लग्नासाठी तिला प्रपोज केले होते. तो मालवीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र तिचा ठाम नकार होता. ती दुर्लक्ष करत असल्याने योगेश तिचा पाठलाग करत असे.

https://www.instagram.com/p/CC3sU9yB8kT/?utm_source=ig_web_copy_link

मालवीच्या नकारामुळे संतापलेला आरोपी तिच्यावर पाळत ठेवून होता. दोनच दिवसांपूर्वी मालवी दुबईहून परतली असता तिच्या बिल्डिंगखाली उभा होता. काल रात्री अंधेरीतील वर्सोवा भागात तो ऑडीने आला आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. मालवीच्या पोटात, मनगटावर आणि बोटावर अशा तीन ठिकाणी वार केल्याची माहिती आहे. जखमी मालवीवर अंधेरीतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती सुदैवाने धोक्याबाहेर आहे. मुंबईतील वर्सोवा पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Film Actress Malvi Malhotra attacked for rejecting marriage proposal)

 

https://www.instagram.com/p/CGuoafJBTjd/?utm_source=ig_web_copy_link

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment