#hyderabad: महिलांनी पोलिसांना बांधल्या राख्या; फुलांचा वर्षाव अन फटाके वाजवत जल्लोष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टिम HELLO महाराष्ट्र। हैद्राबाद मधील निर्भया प्रकरणातील चारही आरोपीना पोलिसांनी एन्काउंटर करत कंठस्नान घातल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियाद्वारे हैद्राबाद पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यामुळे जनभावना पोलिसांच्या पाठीशी असल्याचे पाहायला मिळत आहे.

हैद्राबाद प्रकरणातील पीडितेला १० दिवसांच्या आत न्याय मिळाल्याने कारवाईनंतर हैद्राबादमध्ये महिला वर्गाकडून पोलिसांचे आभार मानले जात आहेत. पोलिसांनी केलेली कामगिरी योग्यच असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून येत आहेत. तर ही कारवाई करणाऱ्या पोलिसांना हैद्राबादमध्ये महिला वर्गाकडून राख्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच खांद्यावर उचलून आणि फटाके वाजवून हैद्राबादमधील नागरिकांकडून या कारवाईला समर्थन मिळत आहे.

दरम्यान या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तर, विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनीही या एन्काऊंटरबाबात संशय व्यक्त केला आहे.

Leave a Comment