नित्यानंदचा पासपोर्ट सरकारकडून रद्द, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । वादग्रस्त स्वघोषित स्वामी नित्यानंद याचा पासपोर्ट केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने रद्द केला आहे. तसेच नव्या पासपोर्टसाठी त्याने केलेला अर्जही फेटाळला आहे. नित्यानंदला आश्रय दिल्याचा इन्कार इक्वेडोरच्या सरकारनेही केला आहे.

मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी यासंदर्भात सांगितले, नित्यानंदवर पाळत ठेवून त्याला पकडण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या भारताच्या विदेशातील सर्व मोहिमा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे जाहीर केले असून, कोणतीही माहिती संबंधित स्थानिक प्रशासनाला तत्काळ देण्याचेही संबंधितांना सांगण्यात आले आहे.

नित्यानंद अनेक प्रकरणांमध्ये भारताला हवा आहे. यामध्ये एका बलात्काराच्या प्रकरणाचाही समावेश आहे. नित्यानंदने कैलास नावाचा स्वतःचा देस तयार केल्याच्या वृत्ताचे रवीश कुमार यांनी जोरदार खंडन केले. केवळ संकेतस्थळ तयार करणे म्हणजे देशाची उभारणी करणे होत नाही, याकडे कुमार यांनी लक्ष वेधले. इक्वेडोरच्या मदतीने नित्यानंदने दक्षिण अमेरिकेत एक बेट खरेदी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहेय मात्र असे वृत्त नित्यानंद आणि त्याच्या अनुयायांनी प्रसारित केल्याचे रवीश कुमार म्हणाले.

Leave a Comment