जळगाव हादरलं; ४ चिमुकल्यांची कु-हाडीनं घाव घालून निर्घृण हत्या

जळगाव । जळगाव जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. रावेरमध्ये एकाच वेळी ४ चिमुकल्यांची कु-हाडीनं घाव घालून हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये 2 मुली आणि 2 मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (jalgaon crime news 2 girls and 2 boys murder dead body found in Farm)

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर बोरखेडा रोडवरील शेतात ही घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारात गावतील काहींना शेतामध्ये ४ लहान मुलांचे मृतदेह आढळला. यानंतर रावेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. चौघांचीही कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. तर हे चौघेही अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून हत्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन मुलं आणि दोन मुलींचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस स्थानिकांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com