धक्कादायक! कोरोनामुळे आईचा मृत्यू झाल्याने मुलाने केला डॉक्टरांवर चाकूने हल्ला

लातूर । शहरातील अल्फा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. दिनेश वर्मा यांच्यावर चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील एका महिलेचा कोरोनामुळे आज पहाटे मृत्यू झाला. त्याचा राग मनात धरून मृत महिलेच्या मुलाने हा चाकू हल्ला केला. यात डॉक्टर दिनेश वर्मा यांच्या छातीवर, मानेखाली आणि हातावर चाकूचे वार झाले आहेत. सुदैवाने त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असून त्यांच्यावर लातूरच्याच कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. झी २४ तासा वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

नटवरलाल सगट असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याला लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान डॉक्टरांवरील हल्ल्याचा इंडियन मेडिकल असोसिएशन, लातूरने निषेध केला आहे. तसेच लातूरच्या ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये कोविडचे रुग्ण उपचार घेत आहेत तिथे पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. या हल्ल्यामुळे डॉक्टरांचे मनोधैर्य खचले असल्याची भावना आयएमएच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे.

या घटनेविषयी बोलताना आयएमए, लातूरचे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी म्हणाले की, ‘कोरोनामुळे एक महिला ऍडमिट होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र यानंतर पेशंटच्या नातेवाईकांनी डॉ.दिनेश वर्मा यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने ते धोक्याच्या बाहेर आहेत. यामुळे डॉक्टरांचे मानसिक खच्चीकरण झालं आहे. कोविड सारख्या परिस्थितीत डॉक्टर आपले कर्तव्य बजावत असताना असा हल्ला झाल्यामुळे कोविड हॉस्पिटलला पोलीस प्रोटेक्शन द्यावं अशी आमची मागणी आहे. गुन्हेगारांना शिक्षा होईल असे आश्वासन दिलं आहे. सर्वानी मिळून याचा सामना करू या’ असं आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com