राज्यभर गाजलेल्या कुरळप लैंगिक अत्याचार प्रकरणी आज दोषारोप निश्चित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

 संपूर्ण राज्यभर गाजलेल्या कुरळप येथील राज्यभर गाजलेल्या मिनाई आश्रमशाळेतील अल्पवयीन मागासवर्गीय मुलींवर शारिरीक अत्याचार प्रकरणातील संस्थेचा संस्थापक सचिव अरविंद पवार व सहसचिव मनिषा कांबळे या दोघांविरोधात १८५ पानांचे दोषारोपपत्र जिल्हा न्यायाधिश शेखर मुनघाटे यांच्या कोर्टामध्ये दाखल करण्यात आले. बाललैंगिक अत्याचार अधिनियम व अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार दोषारोप निश्चितीचे कामकाज पुर्ण झाले आहे. पुढील महिन्यांपासून चौकशीचे कामकाज सुरू होणार आहे.

 मिनाई आश्रम प्राथमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचा संस्थापक सचिव अरविंद पवार व सहसचिव मनिषा कांबळे या दोघांनी संगनमताने आश्रमशाळेत शिकणाऱ्या व वसतीगृहात वास्तव्यास असणाऱ्या ८ अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. मनिषा कांबळे हिच्यामार्फत एका खोलीत बोलवून अल्पवयीन मुलींना शाळेतून काढून टाकत दाखल्यावर लाल शेरा मारण्याची धमकी दिली.अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेेचा फायदा घेवून मागासवर्गीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. तसेच ३ अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला होता. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला असून त्यांना अटक करण्यात आली होती.

त्यांना आज कोर्टात हजर केले असता आरोपींनी हा गुन्हा कबूल नसलेबाबत कोर्टात नमूद केले. जिल्हा सरकारी वकील अॅड.रणजित पाटील यांनी अत्याचार प्रकरणातील आरोपींविरोधात तपासी अंमलदार यांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रामध्ये पिडीत मुलींचे जबाब झालेले पंचनामे व इतर महत्वाच्या कागदपत्रानुसार आरोपींनी सकृतीदर्शनी गुन्हा केला असून त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात यावा असा युक्तिवाद केला. त्यानुसार न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी अरविंद पवार व मनिषा कांबळे यांच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार अधिनियम व अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार दोषारोप निश्चितीचे केले.

Leave a Comment