लोकमंगलने शेतकऱ्याच्या नावावर काढले परस्पर कर्ज?;सुभाष देशमुखांच्या कुटुंबियांची होणार चौकशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । माजी सहकारमंत्री आणि दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या परिवारातील सदस्यांशी निगडित असलेल्या लोकमंगल उद्योग समूहाचे आणखी एक प्रकरण आज समोर आले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठेत असलेल्या लोकमंगल साखर कारखान्याने इंडियन ओव्हरसीज बँकेतून शेतकऱ्याच्या नावावर 2 लाख 98 हजार रुपयांचे पीक कर्ज परस्पर घेतले असल्याचा आरोप मंद्रूप येथील शेतकरी गुलाब नाबिलाल शेख यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूरमध्ये तक्रारी ही दाखल केली आहे. लोकमंगल शुगर्सच्या शेअर्स खरेदीसाठी त्याचबरोबर ठिबक सिंचन योजनेसाठी 2011 मध्ये शेख यांनी कारखान्याला सातबारा, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड दिले होते, त्या कागदपत्रांचा गैरवापर करून कारखान्याने कर्ज काढले असल्याचा आरोप शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकमंगलवरती केला आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment