आमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यास फाशीची शिक्षा द्या : अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करा, अशी मागणी अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. अंमली पदार्थांच्या व्यसनांमुळे तरुण पिढी बरबाद होऊ लागली आहे. विशिष्ट देशांमधून येऊन इथे येऊन अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना आपल्या देशात येण्यास बंदी घाला. अशी मागणीदेखील पवार यांनी केली आहे.

राज्यात तरुणांमध्ये वाढत असलेली व्यसनाधिनता हा गंभीर विषय असून गेल्या वर्षी राज्यात १हजार कोटींपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज पकडण्यात आल्याचा मुद्दा अजित पवार यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. व्यसनांमुळे तरुण पिढी बरबाद होत असून घरातील पालक नोकरी करत असल्याने मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, हा मुद्दा उपस्थित करत ड्रग्जवर आळा घालण्याकरता कठोर तरतुदी केल्या पाहिजेत, अशी मागणी पवार यांनी केली. तसेच यासाठी राज्य सरकारने अधिकचा निधी द्यायला हवे, असेही त्यांनी सुचवले.

दरम्यान, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी व्यसनाधीतेचे प्रमाण वाढत असल्याचे मान्य करत जिथे २ वर्षांची शिक्षा आहे तिथे १० वर्ष इतकी शिक्षा वाढवण्यात आली असून काही गुन्ह्यांसाठी असेलली १० वर्षांची शिक्षा २० वर्षांपर्यंत वाढवण्यात आली असल्याचेही पाटील यांनी सांगितले. महाविद्यालये आणि संवेदनशील भागात सध्या वेशात पोलीस गस्त घालत असल्याचे पाटील त्यांनी सांगितले.

Leave a Comment