धक्कादायक! दसऱ्याच्या दिवशीच पती-पत्नीने केली आत्महत्या

यवतमाळ प्रतिनिधी। आजच्या काळात माणसाला जगण्यापेक्षा मृत्यू सोपा वाटू लागला आहे. आयुष्यात जगण्यासाठीची धडपड करण अवघड वाटू लागल की आत्महत्या हा पर्याय बाकी राहतो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या आत्महत्येची बातमी कळातच पत्नीने देखील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेविषयी मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे फकिरा गणपत पिटलेवाड आणि निला फकिरा पिटलेवाड हे दाम्पत्य राहत होते. गेल्या दोन दिवसापासून फकिरा बेपत्ता होते. घरच्यांनी शोध घेतला असता आज फिकीराचा मृत्यूदेह गावातील विहिरीत आढळून आला.

ही वार्ता मृतकाची पत्नी निलाला कळताच तिने सुद्धा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज ऐन दसऱ्याच्या दिवशी पती-पत्नी ने आत्महत्या केल्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, या दाम्पत्याच्या आत्महत्यांचे मागचे कारण अजून कळू शकले नसून पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

इतर काही बातम्या-

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com