संवेदनशील प्रकरणात माध्यमांनी आततायीपणा करु नये – पोलीस प्रमुख व्ही.सी.सज्जनार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । अवघ्या देशभरात लोकांच्या चर्चेचा विषय बनलेल्या तेलंगणातील सामूहिक बलात्काराच्या केसचा निकाल शुक्रवारी सकाळी पोलिसांनी एन्काउंटर करून लावून टाकला. पोलीस प्रमुख व्ही.सी.सज्जनार यांच्या नेतृत्वाखाली राबविल्या गेलेल्या या मोहिमेत चारही आरोपींना पोलिसांवर हल्ला केल्याच्या कारणास्तव गोळ्या घालून मारण्यात आलं.

दोन दिवस पोलिसांच्या चौकशीसाठी कोठडीत असलेल्या चारही आरोपींना घटनाक्रम समजून घेण्यासाठी नियोजित ठिकाणी नेण्यात आलं होतं. पोलीस प्रमुख व्ही.सी.सज्जनार यांच्या एन्काऊंटरच्या निर्णयावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांना तात्काळ निकाल लागल्यामुळे आनंद आला असून पोलिसांच्या या कृत्याचं त्यांनी कौतुकही केलं आहे. मात्र काही लोकांसह राजकीय नेत्यांनी या प्रकाराकडे शंकास्पद नजरेने पाहिल्याने हा एन्काऊंटर फेक असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

मात्र सकाळीच पत्रकार परिषद घेत सज्जनार यांनी या प्रकरणाचा खुलासा केला. आमचा त्यांना मारण्याचा कोणताही हेतू नव्हता, मात्र त्यांच्यातील दोघांनी आमच्या बंदुका हिसकावून घेत आमच्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागल्याचं सज्जनार म्हणाले. हे अतिशय संवेदनशील प्रकरण असून माध्यमांनी बातम्या देताना आततायीपणा करु नये असंही सज्जनार पुढे म्हणाले.

Leave a Comment