आमदाराने बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेशी केले लग्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
दिल्ली प्रतिनिधी 
 त्रिपुरातील सत्ताधारी असलेल्या ‘आयपीएफटी’ पक्षाच्या आमदाराने बलात्काराची तक्रार करणा-या पीडितेसोबतच लग्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्रिपुराचा आमदार धनंजॉय विरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो जामीन मिळावा म्हणून, त्रिपुरा उच्च न्यायालयात गेला होता. मात्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यानंतर, त्याने ८ दिवसांतच पीडितेसोबत लग्न केले.
त्रिपुरातील सत्ताधारी असलेल्या ‘आयपीएफटी’ पक्षाचा आमदार धनंजॉय त्रिपुरावर २० मे रोजी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी संबधीत आमदारावर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आमदार धनंजय  फरार झाला होता. त्यानंतर या आमदाराने अटकपूर्व जामिनीसाठी उच्च न्यायलयात धाव घेतली होती. मात्र त्रिपुरा उच्च न्यायालयाने १ जून रोजी हा जामीन अर्ज फेटाळून लावला. जामीन मिळत नसल्याने आमदार धनंजयने आरोप करणाऱ्या पीडितेसोबतच अगरतला येथील चतुर्दास देवता मंदिरात लग्न लावले.
या लग्नसमारंभला दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. तसेच यापुढे एकमेकांवर कोणत्याही प्रकारची तक्रार पोलिसात दिली जाणार नसल्याचे निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला. तेसच लग्नाची कायदेशीर नोंदणीसाठी मंगळवारी कागदपत्रांची पूर्तता केली जाणार असल्याची माहिती, आमदाराराचे वकील अमित देबबर्मा यांनी दिली आहे.

Leave a Comment