कंगना रनौत विरोधात मुंबई पोलीस करणार ड्रग्स प्रकरणाची चौकशी ; गृहमंत्री अनिल देशमुखांचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणा नंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सतत वादग्रस्त वक्तव्य करत चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी कंगणाने मुंबई पोलिसांवर शंका उपस्थित केली होती. परंतु आता मात्र कंगणाला हे सर्व महागात पडण्याची शक्यता आहे.

कंगना विरोधात महाराष्ट्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, ड्रग्जप्रकरणी मुंबई पोलिसांना कंगणा विरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. असे म्हटले जात आहे की अभिनेता अध्ययन सुमनने एका वक्तव्या दरम्यान म्हटले होते की, कंगना रनौत ड्रग्स घेते.

काही दिवसांपूर्वी अध्ययन सुमन यांनी कंगना बद्दल वक्तव्य करताना म्हणलं होत की कंगना ड्रग्ज घेते आणि मलाही घेण्यासाठी बळजबरी करते. त्यामुळे या प्रकरणी आता मुंबई पोलीस चौकशी करतील असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment