घराच्या वाटणीवरून चुलत्याकडून पुतण्याचा कोयत्याने खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे |

तासगाव तालुक्यातील कुमठे येथे घराच्या वाटणीवरून झालेल्या वादात पुतण्याने चुलत्याचा कोयत्याने गळ्यावर वार करून खून केला. भीमराव नेताजी गाडे असे मयताचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी रात्री अकराच्या दरम्यान घडला. याप्रकरणी पुतण्या रोहित ऊर्फ बाला गजानन गाडे याच्याविरूद्ध तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तासगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली.

कुमठे येथील भीमराव तुकाराम गाडे आणि रोहित गजानन गाडे या चुलते आणि पुतण्यामध्ये घराच्या वाटणीवरून अनेक दिवसांपासून वाद होता. त्यातून नेहमी त्यांच्यात अनेकदा भांडण व बाचाबाची होत होती. गावातील लोकांकडून त्यांना अनेकदा समजावले होते. तरीही त्यांच्यात अनेकदा खटके उडत. सोमवारी दुपारी घरात रोहित झोपला होता. यावेळी लहान मुले दंगा करून झोप मोड करत असल्याच्या कारणावरून त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. हा वाद रोहितच्या डोक्यात चांगलाच बसला. त्यानं काटा काढायचा विचार केला. वादावादी नंतर रात्री भीमराव गाडे यांना घरातल्यानी समाज मंदिरात झोपायला पाठवले.

रात्री साडेअकराच्या दरम्यान वडिलांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. आम्ही दरवाजाकडे गेलो असता दरवाजास बाहेरून कडी घातली होती. आम्ही खिडकीतून पाहिले असता तो वडिलांवर कोयत्याने वार करत होता. आम्ही आरडाओरडा केल्यानंतर माणसे गोळा होत लखन कुरणे याने घराची कडी काढली. तोवर लोक गोळा झाल्याने रोहितने पळ काढला. त्यांच्या गळ्यावर, हनुवटी, दंड, हातावर व मानेवर कोयत्याने जबरी वार केल्याने त्यातून रक्त येत होते. जखमी अवस्थेत भिमराव यांना सांगली येथे शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले. तेव्हा भीमराव यांचा मृत्यू झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment